मा.श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री

मा. ना. पंकजाताई मुंडे
ग्रामविकास मंत्री

मा. श्री. दीपक केसरकर
राज्यमंत्री

मा. सौ. प्रितमताई मुंडे - खाडे
खासदार, बीड

मा. सौ. संगीताताई ठोंबरे
आमदार

मा. श्री. नामदेव ननावरे
सी.ई.ओ. जि. प. बीड

सौ. उषाताई किर्दंत
सभापती, पं. स. अंबाजोगाई

सौ. सरीताताई लव्हारे
उपसभापती

श्री. दत्तात्रय गिरी
गटविकास अधिकारी, अंबाजोगाई
मनोगत

पंचायत समिती अंबाजोगाईचे हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरु करताना आज आम्हाला अत्यानंद होत आहे.

सध्याचे युग हे स्पर्धा व माहितीचे आहे. शासन स्तरावरील सर्व योजना व कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेला कमीत कमी वेळात उपलब्ध करून देणे व शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावी पाने करून नागरिकांचे जीवन सुसह्य करणे याबाबत मा. पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री न. पंकजाताई मुंडे यांच्या सतत सूचना व आग्रह असतो. त्यांच्याच आवाहनाचा एक भाग म्हणून पंचायत समिती व शासन स्तरावरील योजना व उपक्रमांची माहिती तालुक्यातील जनतेला उपलब्ध करून देणे हेच हे संकेतस्थळ सुरु करण्यामागील मुख्य भूमिका आहे.

हे संकेतस्थळ सुरु करण्याबाबत मा. खासदार प्रीतमताई मुंडे, मा. आमदार संगीताताई ठोंबरे, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नामदेव ननावरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

हे संकेतस्थळ परिपूर्ण असल्याचा दावा आम्ही करणार नाहीत. यामध्ये अनावधानाने काही त्रुटी/चुका असल्यास क्षमस्व! याबाबत आपल्या सूचना स्वागताहर्य आहेत. योग्य असल्यास आम्ही नक्कीच स्वीकार करू.

शेवटी आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान कै. श्री. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!


- सौ. उषाताई जीवन किर्दंत, सभापती
- सौ. सरिताताई दिनकर लव्हारे, उपसभापती
- श्री. दत्तात्रय भगवान गिरी, गटविकास अधिकारी

दि. १ मे २०१६


बातम्या
 • बीड जिल्ह्यातील पहिले डासमुक्त व हागणदारीमुक्त गाव वागदरवाडीचे मा. खासदार प्रीतमताई मुंडेंच्या हस्ते उद्घाटन

 • सत्यमेव जयतेच्या वाटर कप मार्गदर्शनासाठी सिने अभिनेता आमीर खान याची अंबाजोगाई भेट. दि. १५ एप्रिल २०१६

पंचायत समिती उपक्रम
 • पंचायत समिती अंबाजोगाई येथे दि. १ जानेवारी २०१६ पासून कर्मचार्यांचे उपस्थितीसाठी बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीची सुरुवात.

 • माझी ग्रामपंचायत, माझा स्वाभिमान - उपक्रम

  -
  ग्रामस्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्राम प्रशासनातील एकदम तळातील कर्मचारी आहे. ग्रामसुविधा देण्यात त्याचे मोठे योगदान असते. त्याच्या कार्याची प्रतिष्ठा व स्वाभिमान जपण्यासाठी पं. स. अंबाजोगाई मार्फत या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

  सर्व ग्रामपंचायत कर्मचार्यांना गणवेश व ओळखपत्र देऊन १ मे या कामगार दिनाच्या पूर्व संध्येला साम्म्नीत केले जात आहे.

 • मिनी BDO उपक्रम

  पंचायत समिती कारभारात सुसूत्रता येण्यासाठीव योजनांची परिणामकारक अंमलबजावणीसाठी पंचायत समिती अंबाजोगाई अंतर्गत जिल्हा परिषद गटनिहाय एक अधिकार्याची मिनी BDO हि संकल्पना राबवली जात आहे.

 • पंचायत समिती कर्मचारी व अधिकार्यांसाठी एकच गणवेश

  पंचायत समिती अंबाजोगाई अंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांना एकीची भावना व शिस्त निर्माण होण्यासाठी तसेच पंचायत समिती कर्मचार्यांची ओळख निर्माण होण्याच्या उद्देश्याने सर्व विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी १ मे पासून एकच रंगाचा गणवेश उपक्रमास सुरुवात.
मा. ग्राम विकास मंत्री: संदेश
मा. ग्राम विकास मंत्री: संदेश
महत्वाचे दुवे